बाबासाहेब तुम्ही भाग्यविधाते
बाबासाहेब तुम्ही भाग्यविधाते
तू चंदनाप्रमाणे झिजला अपार बाबा
केलेस तू सुगंधी आमुचे शिवार बाबा।।धृ।।
जाणीव नव्हती आम्हा माणसातल्या माणसाची
मोडून काढली तू दरी स्पृश्य- अस्पृश्यतेची
राममंदिरी दर्शनाचा मिळवून दिला ताबा
केलेस तू सुगंधी आमुचे शिवार बाबा।।१।।
शिक्षणाचे पटविले महत्व स्वकृतीने साऱ्यांना
लेखणीच्या एल्गाराने खुजे कर्तृत्व ताऱ्यांना
नतमस्तक तव चरणावरी सलाम हा घे बा।।२।।
संविधानरूपी शस्त्राने अधिकार कर्तृत्व जाण
तुझ्या बुध्दीतेजाने दिपविलेस अस्मान
निरुत्तर केले कर्मठांच्या निष्ठूर हजार जाबा
केलेस तू सुगंधी आमुचे शिवार बाबा।।३।।
बुध्दाची शिकवण अंगिकारली निष्ठेने
जातीपातीच्या भितींना उखडले जिद्दीने
दिक्षा देत सकलजनां सांगे ध्येयासाठी राबा
केलेस तू सुगंधी आमुचे शिवार बाबा।।४।।