ही प्रीत तुझी
ही प्रीत तुझी
1 min
469
ही प्रीत तुझी सख्या
स्पर्श तुझा सोनसळी
श्वास अधीर जाणीव
उमलते देहकळी।
अधरांचा मधुरस
तुझे लाडीक बोलणे
मूक अबोल्यात तरी
राज मनाचे खोलणे।
काळजाच्या या भाषेला
अनामिक राहू देऊ
नातं जपू जन्मांतरी
प्रीत कोंदण हे लेऊ।
नजरेच्या कटाक्षात
भाव प्रकटती गुढ
बोटे गुंफूनी बोटात
का रे लावतोशी वेड।
काय हवे मज आता
राया तुज ठावे सारे
डोळयातल्या आसवांना
नाही जावत सामोरे।
कुस बदलत रोज
रात्र जाते आता माझी
आठवांच्या ओल्या थेंबा
वेडावते मिठी तुझी।
शब्दातल्या शपथेला
वास्तवाची देना जोड
स्वप्नांची नको सजा
जगरीत थोडी मोड।