मिठी
मिठी
कळी फुलली फुलली
दाटे सुगंध भोवती
टंच भरल्या देहात
आली खुलून नवती।
भिरभिर भ्रमराची
प्रितगीत गुंजारव
हरपले देहभान
रूप खुलविते दव।
राणी हिरव्या पाचूच्या
सय पाकळीत बद्ध
कोमेजून जाण्याआधी
प्राशू वाटे मकरंद।
ओढ लागली भेटीची
गोड मिठीला भूलला
मोद प्रितीचा अंतरी
वेडा जीवास मुकला।