बहरला
बहरला
अष्टाक्षरी
आगमन जीवनात
सप्तपदी सोबतीने
बहरला ऋतू नवा
अर्धांगीनी या नात्याने।
किती वाट पाहिली मी
क्षण आज उगवला
आयुष्याचा जोडीदार
मज भाग्याने लाभला।
चंद्र चांदण्याचा साज
नातं तुझं माझं मधू
रेशमाची गाठ घट्ट
प्रियतमा झाले वधू।
आणाभाका नजरेने
हात हाती घेऊनिया
प्रेम ऋतू बहरला
प्रीत तुझी लेवूनिया।
सौभाग्याने लाभ मज
पतीरूप तू भेटला
किती येवोत संकटे
साथ देईन मी तुला।
एकरूप या संसारी
नको देऊ तू अंतर
स्वप्नफुले बहरू दे
वाट चालू निरंतर।
रास सुखाची ओतीन
पडे पाऊल ज्या स्थानी
आनंदाने जगू दोघे
कृतकृत्य या जीवनी।

