स्पंदने
स्पंदने
1 min
168
काळजाला काळजाची, भेटली ही स्पंदने
शब्द झाले पोरके नि, एकरूप झाली मने ॥ धृ॥
लागली ओढ जीवाला, जाहली दूर अंतरे
रोमरोमी छेडणारे, भाव अंतरी नाचरे
जीवनी असता सख्या, सांग सुखा काय उणे ॥१॥
तुझीच स्वप्ने लोचनी, प्रीत स्पर्शाचा उबारा
झंकारती सूर नवे, चिंब चिंब देह सारा
फुलला प्रीतीचा ऋतू, झाले जगणे देखणे ॥२॥
पौणिमेच्या चांदण्याचे, हास्य ओठी भाबडे
दरवळे हृदयात, सुगंधी प्राजक्त सडे
मिटलेल्या पापण्यात, भास तुझेच असणे ॥३॥