पापण्यांच्या काठावर
पापण्यांच्या काठावर


पापण्यांच्या काठावर
तुझ्या आठवांची सय
हृदयाची घालमेल
कुणा सांगायची नाय।।
संकटात वाटे धीर
आधाराचे दोन शब्द
कसे दुरावती जीव
कुठे नेईल प्रारब्ध।।
क्षण क्षण आठवते
तुझ्या नजरेची भाषा
बद्ध चार भिंती आज
तुझ्या भेटीचीच आशा।।
किती केले हितगुज
सल रूततो का जुना
पापण्यांच्या काठावर
आसवांनी केला गुन्हा।
नाही करायचे व्यक्त
राहू दे ना ओठातच
तुझं माझं नातं जपू
काळजाच्या देठातच।।