ऊनपाऊस
ऊनपाऊस
आला श्रावण श्रावण
रिमझिम वर्षासरी
खेळ ऊन पावसाचा
नितदिन नभांतरी॥१॥
धरा हिरव्या शालूत
भासे जणू नववधू
फुले पाने श्रृंगारते
मास श्रावणाचा मधू॥२॥
श्रावणात रानीवनी
मोद भरतो अंबरी
सौख्य समृद्धी नांदते
निसर्गात भूमीवरी॥३॥
इंद्रधनू सप्तरंगी
क्षितीजाच्या पायथ्यास
धरा आकाश मिलन
भेटे साजन आभास॥४॥
निसर्गाची माणसाला
शिकवण हीच खास
ऊन पाऊस जीवनी
सुख दुःखाचा आभास ॥५॥