STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Classics Fantasy

4  

Ganesh G Shivlad

Classics Fantasy

प्रकृती पोवाडा

प्रकृती पोवाडा

1 min
565

प्रभाती प्रभा प्रभाकराला,

पुजिते पंचोपचार पूर्वेला..!

पक्षिणी प्रदक्षिणेस प्राचीला,

पोटी पिलांच्या पोटपाण्याला..!


प्राजक्त प्रितीचा पांढरा,

पसरला प्रितगंध परसात..!

पाहुणा पोपटी पहुडला,

पंख पसरूनी परडीत..!


परागकण पुष्प पाकळीचे,

पारखतो प्रियकर पतंग..!

पाहूनिया पुलकित पल्लवी,

पाझरते परिमळ प्रीतरंग..!


पिंपळ पिळदार पाड्यावरचा,

प्रतिबिंब पाहतो पाण्यात..!

परिधानी पोशाख पितपानांचा,

पेलतो पावसाळा प्रीतीत..!


पळस पहारेदार पायवाटेचा,

पांघरे पर्ण पैठणी पहाडीशी..!

पारंब्या पुरुषाच्या प्रीतझुले,

पोहोचती प्रेमगीत पृथ्वीशी..! 


पोटुशा पखाली पाण्याच्या,

पर्वत पायथ्याशी पलटती..!

पाखरे पराजित पाठशिवणीत,

पाणंदीने पाटप्रवाह पळती..!


पवन पावा पुरुषोत्तमाचा,

पुकारे प्रेमाने पशूपक्ष्याला.!

पर्णे पवित्र पैंजणे पृथ्वीची,

प्रेरिती प्रकृती पोवड्याला..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics