STORYMIRROR

Tukaram Patil

Abstract Classics Tragedy

4.4  

Tukaram Patil

Abstract Classics Tragedy

आम्ही

आम्ही

1 min
27.9K


दगडात देव मोठा शोधायला निघालो

कैदेत देवळांच्या डांबायला निघालो

गाडून टाकलेले दावे जुने पुराणे 

परतून आज सारे खोदायला निघालो

रेटून बोलताना बोलायचे फुकाचे

दारिद्र्य जीव घेणे दडवायला निघालो

काळीज जाळणा-या रचल्या चिताच ज्यानी

त्यांच्या सवे सुखांना शोधायला निघालो

मरते उपासपोटी सारी गरीब जनता

करण्यास मुक्त त्याना गाढायला निघालो

झेंडे  गटा तटाचे  घेवून आज हाती

स्वातंत्र्य लोकशाही बुडवायला निघालो

गाळून घाम साधा जगलो कधीच नाही 

फुकटातलेच सारे  हादडायला  निघालो

बनलोय दास आम्ही आता परंपरांचे

आदर्श संस्कृतीचे तुडवायला निघालो


Rate this content
Log in

More marathi poem from Tukaram Patil

Similar marathi poem from Abstract