STORYMIRROR

ujvala korde

Fantasy

4  

ujvala korde

Fantasy

स्वप्नं

स्वप्नं

1 min
495

लावून कल्पनांचे पंख

झेप घेतली मी आकाशी.

आजूबाजूला दिसत होत्या

मऊ मऊ कापसाच्या राशी.


काही सफेद तर काही निळे

वाटले तिथेच लोळण घ्यावी .

स्पर्श त्यांचा अनुभवताना

आनंदाची गाणी गावी.


ढगा सोबत सैर करावी

या गावातून त्या गावा.

एखादा ढग फोडून पहावा

पहिला पाऊस तिथेच यावा.


ढगा आड लपलेला तो

चंदामामा हळूच पहावा.

ससा दिसतो का ते हरीण

याचा नीट अंदाज घ्यावा.


चार चांदण्या गोळा कराव्या

शुक्र तारा जवळून पहावा.

ग्रहांसोबत करून दोस्ती

दिवस माझा मजेत जावा.


स्वप्नातल्या कल्पना साऱ्या

सत्यात कशा बरे उतराव्यात!

तरीही मनाच्या सागरामध्ये

समाधानाच्या लाटा याव्यात.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy