वेळेचे महत्व
वेळेचे महत्व
1 min
3.1K
क्षणाचं महत्व समजायला हवं
रोज समोर असतं आव्हान नवं
एकदा का वेळ निघून जर गेली
मग लागतं वाट बघत बसावं....
वेळेचे महत्व जो कुणी जाणतो
त्याच्यासाठी आभाळ थिटे
शिस्तबद्ध राहण्याने त्याला
जे हवे ते सहज भेटे.....
आयुष्य आपलं हे सोनेरी
राखावे वेळेचं भान नेहमी
होई सारे सारे मनासारखे
वेळ देई सुखाची हमी.....
गेलेला वेळ येई ना परत
मग वाईट वाटून काही न उपाय
सावध हो माणसा वेळीच सुधार
नको अडकवूस आळसात पाय...
वेळ कुणासाठी थांबत नाही
कुणाला ठाऊक कसा जाई
कर्म करणं आपल्या हातात
बाकी सारे तो ईश्वर पाही...
