STORYMIRROR

ujvala korde

Romance

4  

ujvala korde

Romance

कन्यादान

कन्यादान

1 min
473

डोक्यावर अक्षता पडल्या,

कन्यादानही झाले

शुभ मंगल पार पडून

मी तुझी स्वामिनी झाले.


दुरावले माहेर आता

दाटले डोळ्यात पाणी

पाऊले ही स्तब्ध होती

मायेच्या त्या आठवांनी


तशाच जड पावलांनी

ओलांडले मी माप

जबाबदारीचे ओझे

जाणवले आपोआप


नवी स्वप्ने नव्या वाटा आहेत

सासरी जाऊन आता

प्रेमाने जिंकून घेईन साऱ्यांना

लाडकी होईन पाहता पाहता.


संस्कारांची बांधून शिदोरी

नव्या प्रवासाची सुरुवात.

नवी आशा ,नवीन नाती ,

नवे उत्तेजना सळसळे देहात.


अनोळखी जरी सारे,

तुझीच साथ तुझाच आधार.

तुझ्या सोबतीने होईल

सुखी जीवनाचे स्वप्नं साकार.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance