STORYMIRROR

ujvala korde

Tragedy

3  

ujvala korde

Tragedy

वृद्धाश्रम नको

वृद्धाश्रम नको

1 min
550

असा दिवस जरूर उगवावा

वृद्धाश्रम कायमचा बंद व्हावा

जो तो आपल्या घरामध्ये

आनंदाने सुखात राहावा.


पडू देत सारे तसेच ओसाड

आपले आई बाबा घरीच बरे

त्यांचीच सेवा खरे समाधान

नाही आणि दुसरे पुण्य खरे


आपण झालो लहानाचे मोठे

आज यशाचे शिखर गाठलेय

त्याच्यासाठी आई बाबांचे

तीळ तीळ रक्त आटलय.


आता त्यांना गरज आपली

नका त्यांना वाऱ्यावर सोडू

पुरी करू कर्तव्य आपली

आपण सारे पांग फेडू


अशी वेळ जरूर यावी

वृद्धश्रमाची गरजच नसावी

आता येणारी पिढी भावी

वडीलधाऱ्याच्या सोबत राहावी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy