STORYMIRROR

Vrushali Khadye

Tragedy

1.0  

Vrushali Khadye

Tragedy

मला शिकायचं हाय!

मला शिकायचं हाय!

1 min
1.0K



अर्धवट शिक्षण सोडलेल्या मुलाची व्यथा

(चाल-काठी न घोंगडं घेऊ द्या की रं)


आरं पाटी न् पुस्तक घेऊन द्या की रं

मला बी शाळेत येऊ द्या की ||धृ||


घरची हालत हाय बेकार

आय माझी हाय खाटेवर

बा जातोया अड्ड्यावर

अन्न मिळत नाय पोटभर

म्हणून जातोया मजुरीवर

तवा पोटास मिळे भाकर

शाळा सुटलीया अर्ध्यावर

पुन्हासनी यायचं शाळेवर

शिकायचं घेतल मनावर

अक्षर गिरवीन पाटीवर

आरं शिक्षणाचा आधार मिळू द्या sss

आरं शिक्षणाचा आधार मिळू द्या की रं

मला बी शाळेत येऊ द्या की..||1||


R.T.E.आणला सरकारानं

सुरू शाळाबाह्य सर्वेक्षण

संधी दिली आम्हां नव्यानं

फुलेल पुन्हा हे नवजीवन

लिहा-वाचाया मी शिकेन

आकडेमोड नव्याने करेन

नाच गाण्यावर ताल धरेन

चित्रात नवनव रंग भरेन

धडे शिस्तीचे बघा गिरवेन

शिकायचाच ध्यास घेईन

आरं शाळा शिकून साहेब होऊ द्या sss

आरं शाळा शिकून साहेब होऊ द्या की रं

मला बी शाळेत येऊ द्या की..||२



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy