STORYMIRROR

Vrushali Khadye

Others

3  

Vrushali Khadye

Others

नारी शक्ती

नारी शक्ती

1 min
258

स्त्रीजन्म असे पुण्याई

सुखहर्ष सर्वा देई

आईबापाची सावली

बहिणभावाची माऊली||१||


माहेरा सोडून जाई

कंठ दाटुनिया येई

सासरी सर्वस्व देई

अंगी अशीही नवलाई||२||


नवमास बाळ पोटी

यातनाच बहु पाठी

परी हास्य सदा ओठी

पान्हा वात्सल्याचा कंठी||३||


घरासाठीच कष्ट करी

हिंडे फिरे दारोदारी

तहानभूक सारे विसरी  

सुखस्वप्नांची पुर्ती करी||४||


जाणा नारीची ही शक्ती

गुंग होईल ही मती

निसर्गाची ही निर्मिती

मान,सन्मानाची मूर्ती||५||



Rate this content
Log in