बालदिन
बालदिन
1 min
148
शाळा सजली,वर्ग नटले
चौदा नोव्हेंबर बालदिनी
आनंदाचे पंख लेवूनि
मुले बागडती या अंगणी
गमतीजमती किती सांगू!
मनसोक्त नाचती डोलती
गप्पाटप्पा करूनी मित्रांसंगे
खाऊ खाती,खेळ खेळती
आज भासती फुलपाखरे ही
रंगीत फुलांचा जणू ताटवा
बालपणीचा काळ सुखाचा
प्रत्येक क्षण नयनी साठवा
रोज असावा बालदिन हा
कोडकौतुक सदा व्हावे
मनामनात या जीवनात
इंद्रधनुचे सप्तरंग भरावे
