STORYMIRROR

Vrushali Khadye

Children Stories

2  

Vrushali Khadye

Children Stories

अन्नपचन (विज्ञान गीत)

अन्नपचन (विज्ञान गीत)

1 min
658

कोणास ठाऊक कसे?

अन्नपचन होते असे!..||धृ||


घास जाता तोंडात

लाळ मिसळे अन्नात

होई पिष्टमयाचे पचन

अन्नाचे होते पुढे वहन...||१||


जाठररस हा जठरात

अन्नाचे रूपांतर आम्लात

प्रथिने, कर्बोदकांचे पचन

अन्नाचे होते पुढे वहन...||२||


अन्न आले लहान आतड्यात

पित्त, स्वादुरस मिसळे त्यात

स्निग्ध पदार्थांचे पचन

पूर्ण होई अन्नपचन...||३||


क्षार, पाणी करी शोषण

मलाचे होई पुढे वहन

मलाचे स्थान मोठे आतडे

मल गुदद्वारे बाहेर पडे...||४||


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍