STORYMIRROR

Vrushali Khadye

Abstract

2  

Vrushali Khadye

Abstract

मैत्री

मैत्री

1 min
428

ना असू रक्ताचे

ना असू नात्याचे

बंध जुळती मनाचे

ती मैत्री!


मनीचे सांगावे वाटे

हसावे, रडावे वाटे

पुन्हा भेटावे वाटे

ती मैत्री !


मनाची घट्ट वीण

घालवी सारा शीण

नवचैतन्याचा दिन

ती मैत्री !

 

भेटीच्या खुणा

धुंद करी मना

करी रोमांच तना

ती मैत्री !


प्रेम अपुले खरे

आनंद हृदयी भरे

सयेंनी ऊर भरे

ती मैत्री !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract