मतदार तू !
मतदार तू !
मतदार राजा जागा हो! जागा हो!
बळकट लोकशाहीसाठी सज्ज हो!
भारतीय संविधानाचा ठेव मान
मतदानाने वाढेल तुझीच शान
तू राष्ट्राचा सुजाण नागरिक
उज्ज्वल भविष्याचा पाईक
मोहाला बळी पडू नकोस
बोलण्याला तू फसू नकोस
तुझ्या मतदानाने टक्का वाढेल
लोकशाहीचा खरा उत्सव घडेल
तुझे सरकार तूच आणू शकतोस
मतदानाने भविष्य बदलू शकतोस