पाठलाग स्वप्नांचा....
पाठलाग स्वप्नांचा....
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
पाठलाग स्वप्नांचा
मी करत राहिले...
ना मागे वळूनी पाहिले
आभासी मनोरे मी रचत राहिले
कधी धडपडले, कधी कोलमडले
कधी धीराने उभी राहिले
मागे ओढण्यास मला
अनेक सरसावले
मदतीला नाही मात्र, पाय खेचण्यास
मागे माझ्या उभे राहिले
माझे म्हणुनी......?
मी ज्यांना जवळ केले
त्यांनीच माझे स्वप्न भंग केले
पण मी नाही हारले
पाठलाग स्वप्नांचा
मी करत राहिले...
ना मागे वळूनी पाहिले
आहे मी खमकी
आता शांत आहे
म्हणजे नाही मी मुकी
खेळ सारा हा नियतीचा
वेळ मात्र निभावूनी नेते
मुखवट्या मागील खरे चेहरे
प्रत्येकाला दाखवून देते