STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action Inspirational

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action Inspirational

एक दिवा

एक दिवा

1 min
216

तुटकी चप्पल आणि फाटक बनियान घालून

आपल्या लेकराला ब्रँडेड वस्तु घेवू देणाऱ्या बापाला एक दिवा...


मुलगा/मुलगी घरी आल्यावर त्यांना आवडीच

पोटभर खाऊ घालणारी आपली अन्नपुर्णा आईला एक दिवा...


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जुळून घेवुन

जन्मोजन्मी साथ देणाऱ्या माझ्या पतीरायांना एक दिवा...


लहान असो वा मोठा गंभीर प्रसंगी खंबीर

पाठीशी उभ्या राहणाऱ्या भावाला एक दिवा...


प्रत्येक सुख-दुःखात सोबत असणाऱ्या बहिणीला एक दिवा...

लग्नानंतर आई-वडिलांचे प्रेम देणाऱ्या सासु-सासऱ्यांना एक दिवा...


लहान असो वा मोठा आपल्या नवऱ्याला जीव लावणारा

काही असो नेहमी सोबत असणाऱ्या दिराला एक दिवा...


सासरची शान आणि भाचे मंडळींची लाडकी

आत्त्तू आमच्या वंसनां एक दिवा...


जेव्हा-तेव्हा नुसत्या गप्पा मारणाऱ्या, मिळून-मिसळून

साऱ्या घरादाराला एकत्र बांधून ठेवणाऱ्या जाऊबाईना एक दिवा...


घराचं माझ्या गोकुळ करणाऱ्या

माझ्या लेकरांना एक दिवा...


माझ्या आयुष्यात कायम आनंद आणि तरुणपण

जिवंत ठेवणाऱ्या मित्र-मैत्रिणींना एक दिवा...


रक्ताचे तर येतातच धावून संकटात पण त्यांच्या आधी

शेजार धर्म पाळणाऱ्या माझ्या सख्या शेजाऱ्याला एक दिवा...


आपले घरदार,सणवार विसरून बहुतेक वेळा

रस्त्यावर ड्युटी करत घालविणाऱ्या खाकी वर्दीतीला एक दिवा..


जो शेतात राबतो तो तेव्हा आपण

दोन घास खातो त्या बळीराजाला एक दिवा...


आपण सुखाने जगतोय कारण ते दिवस-रात्र

सीमेवर तैनात आहेत म्हणून प्रत्येक जवानाला एक दिवा...


अन् शेवटी एक दिवा त्या गाभाऱ्यातल्या

सावळ्या विठुरायाला सुखी ठेव रे पांडुरंगा साऱ्यांना...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy