STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

भीक....

भीक....

1 min
143

आहे तिथेच हा श्वास थांबावा

नको भीक मला या जगण्याची


खूप पाहिले निशब्द सोसले

पाठीमागून फक्त गाऱ्हाणेच ऐकले


आपले म्हणून ज्यांना जपले

त्यांनीच सर्वात आधी परके केले


सारे विसरून जायचे मनास समजावले

सोबतीला मात्र माझ्या कोणीच नाही राहिले


एकटीला ही नाही नीट जगू दिले

वाह रे दुनिया तुझी ही दुनियादारी


मी एकटीच होते अन् एकटीच राहिले

नको आता सोबत कोणत्याच नात्याची


आयुष्याच्या मैफिलीत रंग सारे माझे

अंग चोरुन सावरून बसले


कोणास दाखवू त्यांची शोभा

आता इथे न कोण उरले


आहे तिथेच हा श्वास थांबावा

नको भीक मला या जगण्याची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy