STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Romance Tragedy Action

3  

Trupti Thorat- Kalse

Romance Tragedy Action

भलतेच वेड...

भलतेच वेड...

1 min
222

भोवतालीचे जग

हे सारे थांबले

तुझ्या भेटीचे मज

बघ भलतेच वेड लागले

गाभुळलेल्या चिंचेपरी

भासे तू मला रे

नुसत्या विचराने ही

तनास येई शहारे

सुखद या भावना

अनुभवते मी

तुझ्या भासात

जाई मोहरूनी मी

किती सावरू मी

माझ्या ह्या मना

झाले कधीच फितूर हे

नयन पाहुनी तुला

या जीवघेण्या ओढीस

काय मी म्हणावे

उमजेना मलाच वाटे

तू फक्त जवळी रहावे

नजरेस ही भास होई

तुझाच अवती-भवती

आता आरसा पण

तुझेच प्रतिबिंब दाखवी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance