STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action Inspirational

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action Inspirational

खेळ...

खेळ...

1 min
133

सुख जरासे आता विसावले ओंजळीत माझ्या

दुःख तर आहेच पाचवीला पुजलेले


तुला चोरून पाहण्याचा छंद हा पुराना

बघ पारिजात अंगणात नव्याने बहरत आहे


रोजचेच तुझे मला टाळण्याचे बहाणे नवीन

आणि माझे तुझ्यात आणखी गुंतने अटळ


तू न माझा ठावूक असूनही झुरणे तुझ्यासाठी

विरहाने मरणे रोजचेच आता मला छळत आहे


का जडली ही प्रिती तुझ्यावर अंदाज न मला येत आहे

तू माझा व्हावा हा हट्ट तरी मी का करावा...?


तुझे बोलणे हाय हर एक अदा काय सांगू

तुझ्या दिलखेच नजरेवर मी झाले कायमची फिदा


रोजचाच हा आता लपंडाव आहे तुझे टाळणे

अन् मी तुला अभासी कवटाळने....


जगू दे मला ह्या एकदर्फी प्रेमात आता

फक्त झुरणे पुरले तुझ्यासाठी पदरीच माझ्या


जीवघेणा हा खेळ मी खेळते आहे

तुझ्या सुखात माझं सुख मी पाहते आहे 


नाही मिळाला मला तू तरी काही तक्रार नाही

रोज तुला पाहते हे जगण्यासाठी मला पुरे आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy