STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

गुन्हा

गुन्हा

1 min
128

दफन केल्या तुझ्या आठवणी मी आता कुठे

का येतीस रोज फुले वाहण्याच्या बहाण्याने तू

आहे देलेली जखम तू खोलवर

का बळेच आता खपली काढतेस तू

घाव केलेला तुझा जिव्हारी लागला 

आता का गाळती तू आसवे उगाच

मरणे नव्हते कधीच मंजूर

म्हणून जीवंत आहे अजून हे उर

पण त्यात न आता जिव्हाळा आहे

श्वास माझे बस सोबतीला आहे

उठतो बसतो धडपडतो कोलमडतो

तरी ही जिद्दीने मी उभा आहे

सोबत राहून मागे खेचणारे अमाप आहे

पण केसाने गळा कापणारी फक्त तू एक आहे

वाटते खूपदा वागावे बेधुंद होऊन...

पार कराव्या साऱ्या सीमारेषा

पण येवढा शहाणा मी आता राहिलो नाही

समजूत काढणारे आता माझे 

या स्वार्थी जगात कोणी राहिले नाही..

काय दोष देवू तुला मीच चुकलो पुन्हा-पुन्हा

विश्वास तुझ्यावर ठेवला हाच झाला माझा गुन्हा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy