मी आंधळा
मी आंधळा


मी आंधळा या जगातला
मला हे जग दिसत नाही
डोक्यावरचा कर्जाचा बोजा
काही केल्या उतरत नाही
पेटती मशाल हाती घेऊन
नारे नेहमीच मी लावतो
कर्जमाफी मिळावी मला
म्हणून मंत्रालयावर चढतो
मुख्यमंत्री भेटत नाही बोलायला
या आंधळ्याला थोड बोलायचंय
दुख माझे समोर मांडुन मला
त्याचा समोर जाऊन रडायचंय
कर्जमाफीच्या प्रश्नांच्या टाळ्याची
चावी शोधून सुध्दा भेटत नाही
किती ही कापुर टाका मशालीत
आंदोलनाची मशाल पेटत नाही
दिले जाते आश्वासन निसते मग
आमची मशाल तिथेच विजते
उन्हातान्हात शेतात घाम गाळून
आम्हा गरीबांची बनियान भिजते
किती ही काम करुन सुध्दा
डोक्यावरच कर्ज फिटत नाही
तोंडाशी आलेला घास सुध्दा
गिळता गिळता गिळत नाही