STORYMIRROR

Pratik Kamble

Inspirational

3  

Pratik Kamble

Inspirational

बा भिमा

बा भिमा

1 min
14.3K


बा भिमा स्वतः वर्गाबाहेर बसुन 

आम्हा शिक्षणाचा अधिकार दिला

गळ्यातले मडके , झाडु पाठीचा 

काढुन उध्दार आमचा केला 

शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे 

ते आम्ही सदैव प्राशन करणार

तुम्ही दिलेल्या शिक्षणाच्या धड्यांचे

काटेकोर पालन आम्ही करणार

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा 

हा तुमचा शिक्षाणाचा मंत्र

उच्च पदावर जाण्यासाठी आम्ही 

चालवु आमच्या मेंदुचे यंत्र

बा भिमाच्या नावाची महति

आज साऱ्या विश्वात गाजली

शिक्षणाचे महत्त्व पटवुन देताना 

आमची वही व लेखणी सजली

बा भिमा शिक्षणाचे धडे 

द्यायला आज तुम्ही हवे होते

तरुणातील शिक्षणाबद्दलचे

लक्षणे दिसु लागलीत खोटे

आज विद्यार्थी दिनानिमित्त

आम्ही एक शपथ घेतो

शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना

एक मदत म्हणून वही-पेन देतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational