STORYMIRROR

Pratik Kamble

Others

3  

Pratik Kamble

Others

कळा त्या वेदनेच्या

कळा त्या वेदनेच्या

1 min
27.1K


मला होणाऱ्या वेदनेचे दुख

मी आता सांगू तरी कोणाला

शांत बसवत नाही मला आता

म्हणून सगळं सांगते तुम्हाला

कळा सोचत सोचत वेदनेच्या

देह माझा पुर्णपणे झिजविला

उजेडात अंधार असावा म्हणून

पेटवलेला दिवा त्याने विजविला

कालची काळोखाची भयाण रात्र

माझ्यासाठी वैऱ्याची ठरली

तो सैतान माझ्या अंगावर येताच

मनात भितीचे धडकी भरली

अब्रु झाकली होती मी पदराने

त्यांने माझा पदरच फाडलाय

हसत हसत म्हणतोय तो मी

अब्रुशी खेळण्याचा खेळ मांडलाय

वेदनेने होणाऱ्या कळा तिला

आता कुठे जाणवू लागल्या

गुप्त अंगी झालेल्या जखमा

कालांतराने दिसू लागल्या


Rate this content
Log in