STORYMIRROR

Pratik Kamble

Tragedy

3  

Pratik Kamble

Tragedy

मला का एकट सोडल

मला का एकट सोडल

1 min
14.4K


आई ऐ आई सांग मला तू   

नक्की माझे काय चुकले

आठवण खूप येते गं तुझी

का आईच्या सुखाला मुकले

लहान होती मी तेव्हा 

तूच मला समजावले होते

काळजी करु नको बाळा

माझे आयुष्य आहे मोठे

का गं आई तु माझ्याशी 

इतके खोटे बोलली

आपले आई-मुलीची नाते

तुझ्या रक्तानेच जुळली 

का मग तु आज मला 

एकट सोडुन गेलीस

या मायाळु लेकराची तू   

का गं अशी अवस्था केलीस

रडत बसते दिवसभर मी

तुझ्या त्या फोटोकडे पाहुन

विचारते त्या देवाला मी 

त्या देवाच्या देवळात जाऊन

काय चुकले होते मी देवा 

मला तु पोरक केलस

आनंदी होते मी आई सोबत

का मला इतके दुख दिलस


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy