STORYMIRROR

Pratik Kamble

Inspirational

2  

Pratik Kamble

Inspirational

नकोशी

नकोशी

1 min
14.6K


आई दे गं मला जन्म तू 

जग मला सुध्दा बघु दे

मारु नको गं मला गर्भात

उगवता सुर्य मला पाहु दे

रक्ताच नातं गं आपल नको 

कापू जन्मताच माझा गळा

माझ्या लहान भावडांना 

लावील गं मी खुप लळा

विसरु नको गं आता तू  

तु सुध्दा एक मुलगीच आहे

तुला जन्म देणारी आई 

सुध्दा एक मुलगीच आहे

जन्मताच मारले मला तुम्ही

तर भावी पिढी कशी घडणार

सांग गं आई तु आता मला 

झाशीच्या राणी कोण बनणार

झाशीच्या राणी लढली तशी

आता मला सुध्दा लढु दे

स्त्री भ्रूण हत्या करु नका माझी

आता मला सुध्दा जगु दे

चंद्राची चादणी होऊन मी 

आकाशात प्रकाशमय होईल 

नकोशी मला समजु नको 

मी तुझा उगवता सुर्य होईल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational