STORYMIRROR

Pratik Kamble

Abstract Tragedy

1  

Pratik Kamble

Abstract Tragedy

लाज वाटते बाईचा जन्म घ्यायला

लाज वाटते बाईचा जन्म घ्यायला

1 min
3.5K


लाज वाटते मला बाई म्हणून जन्म घ्यायला

जीव घाबरतो समाजात रहायला

लहान मुल बघत नाही इथे 

किंवा नुकतेच जन्मलेले मुल

सोनेरी किरणासोबत आलेले

भल्या पहाटेचे ते कोवळे ऊन

कोवळ्या ऊनासारखीच तर 

कोवळी तान्ही मुले असतात

काही कळत नसताना सुध्दा

अत्याचाराला बळी पडतात

आई बाबा जातात कामावर

मुलाला एकटे घरी ठेऊन

निर्घृणपणे हत्या करतात त्याची

कोण नसल्याचा फायदा घेऊन

लहान बालक सुध्दा आता 

बलात्काराला बळी पडतो

सतत होणाऱ्या अत्याचारामुळे

आजचा सारा समाज रडतो

कुठे गेली यांची अक्कल

गहाण तर ठेवली नाही ना

तान्ह बाळ यांना कळत नाही

लाज यांनी विकली तर नाही ना

लाज कशी वाटत नाही यांना

बलात्कार अत्याचार करायला

यांना शिक्षा नाही तर सरकारने

लावावा यांच्या फास गळ्याला

कुठवर गप्प बसायचे आम्ही

अत्याचार किती सहन करायचे

मुख गिळून आम्ही कुठवर

घुसमटत रडत बसायचे

रडत बसण्याची आता वेळ नाही

अन्यायाला वाचा फोडावी लागेल

शस्त्र हाती घ्या महिलांनो तुम्ही 

समाजाला जागे करावे लागेल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract