विसरला आईला
विसरला आईला
लेकरा विसरलास रे आईला
का मला स्मशानभूमीत धाडले
पंचपक्वान मागत नव्हते मी
मला जेवायला निवद वाढले
दोन वर्षाचा असताना तु लेकरा
तुला दत्तक घेतले होते
दत्तक घेऊनी तुला मी लेकरा
स्वप्न पाहिले खुप मोठे
लहानांपासून आता पर्यंत सदैव
तुझे मी पालनपोशन केले
मला भेटायचे होते कष्टाचे फळ
कुणास ठाऊक कुठे गेले
कडेवर घेऊन मिरवत होती तुला
प्रेमाचा मायेने घास भरवायची
रात्री तु निपचित झोपल्यानंतर
तुझ्यासाठी भावी स्वप्ने सजवायची
तु दत्तक पुत्र असताना सुध्दा
काही कमी नाही केले मी
का दुरावले मला घरापासून
सांग काय चुकीचे केले मी
लेकरा तुझे लग्न झाल्यानंतर
सुनेचा स्वभाव काही पटला नाही
ज्या वेळेस तुझा आधार हवाय
तेव्हा तो आधार भेटला नाही
अडथळा नको संसारात तुमच्या
म्हणून आश्रमात जाते रहायला
खुप आयुष्य मागते देवाकडे
तुझा आनंदी संसार पहायला
