STORYMIRROR

Pratik Kamble

Tragedy

2  

Pratik Kamble

Tragedy

हो मीच ती

हो मीच ती

1 min
13.6K


हो हो मीच ती 

लेकर बाळ उघड्यावर टाकुन 

पोटा पाण्याचा विचार करणारी

दिवसभर उन्हातान्हात फिरणारी

वेदना सोचत गप्प निजनारी

स्वताची अब्रु उघड्यावर विकणारी

हो मीच मी

उपाशी रडतय बसल लेकरु 

पण कधी पान्हा कधी पाजला नाही

आईच्या मायेने त्या लेकराला 

कधी मायेचा घास चारला नाही

का कधी सणाला माझ्या घरचा 

दरवाजा सजला नाही

का हे सगळं का माझ्या नशिबी

का? तर

मी पोटापाण्यासाठी दिवसभर फिरते 

मी भर चौकात फिरुन अब्रु विकते

मी अब्रु विकुन पैसा कमवते

हेच ना इतकेच ना फक्त 

हो माहिती आहे मला सगळं 

पण करणार काय 

पोटसाठी हे करावे लागते

खूप सोसते मी त्या वेदना 

खूप त्रास होतोय मला

जीव जळतो असं करताना 

मन रडत आनंद भरताना 

किंचाळी निघते माझी "आई गं".

पण करणार? कराव लागते

असे सगळे करुन मला 

माझे व माझ्या लेकराचे

पोट भरावे लागते

हो मीच ती 

हो हो बरोबर ओळखले 

हो मीच ती

हो मीच ती...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy