ती...
ती...


जिचा जन्मचं नकोसा असलेली अशी ती ...
जन्मलीचं जरी तरी परक्याचं धन संभोधलं जाणारी ती ...
कळतं न कळतं तोच पायात संसाररूपी बेड्या अडकवली जाणारी ती ...
कितीही हांजी हांजी केलं तरी छळ, निंदानालस्ती सहन करणारी ती ...
मरणयातना सोसून नऊ महिने उदरी वाढवलेला जीव ..शेवटी तू केलंच काय आमच्यासाठी हे ऐकून घेणारी ती ..
कोणी कवडीमोल किंमत देत नसतानाही स्वतःच्या अस्तित्व राखून ठेवण्यासाठी जिद्दोजहद प्रयत्न करणारी ती ...
अशा प्रत्येक त्या स्त्रीला फक्त कागदोपत्री राखीव असलेल्या जागतिक महिला दिनाच्या उज्वलमय शुभेच्छा ।। 🙏