तुझ्या वासनांचा बळी
तुझ्या वासनांचा बळी


चूक तर माझी नव्हतीच मुळी...
मी तर ठरले तुझ्या वासनांचा बळी ..
वर्षे उलटली , काळ उलटला ..
डोळ्यांसमोर तरले सारे..
बरेच झाले , निदान मिटेल तरी माझ्या मनीचे ,
मळभ सारे ...
जग रहाटीचा ज ही न जाणणारी मी ..
पडेनच या बनावटीच्या खेळात कशी..
आठवतो अजूनही, तुझा तो मला न उगमणारा स्पर्श ..
' किळसवाणाच तो '
तेव्हा नव्हे पण आता पक्व वय हे मला सांगून जाई ..
दिवसा सकाळी रात्री अपरात्री ..
तू माझ्यावर धाव घेण्या तत्पर राही ...
एवढी का वेंधळी होते मी ..
तुझा मानस समजू शकले नाही ...
अल्लड वयातील प्रेम समजले असेन मी त्यावेळी ..
वासनांध तुझे मन मात्र तेव्हा उमगले नाही ..
बरोबरच आहे , माझं मन पवित्र होतं अगदी उजेडासारखं ..
अंधाराची कधी गरज लागलीच नाही ..
तू मात्र त्या काळोखाची वाट पाहत राही ...
होतास मात्र अगदी चपळ हा तू ..
अंधारातलं तुझं झाकून ठेवलं खरं तू ..
मी वेडी मात्र त्याला उजेडात आणू पाही ..
बीभस्तना, निंदानालस्ती झाली असेलही माझी ..
चल , जिंकलास तू ..
आणि मी ही ..
वेळीच सावरले या वासनेच्या पिंजऱ्यातून ..
काय माहित नाहीतर किती पडले असते आपल्यातील नात्यांचे बळी ...
इथे संपले नाही ...
खेळ हा पुढे चालू राहणारचं आहे ..
जिथे स्त्री तिथे गुरफटलेल्या पुरुषी वासना ..
मेळ हा पुढे अखंड चालू राहणारचं आहे ..