भास तुझा हा सारा..
भास तुझा हा सारा..

1 min

76
पाऊस वेडा..
झरझरणारा..
मनी शहारा..
सोबत प्रियाची..
गुज मनाची..
उठते तरंग..
बहरे अंग..
स्पर्श धुंद..
मोहवणारा..
कोसळता बेभान सरी..
नयन खुलती..
गार वारा..
अंगी बोचणारा..
जाणवते मग..
नसे सत्य हे..
मनी उमगणारा..
भास तुझा हा सारा..
माझिया प्रियाचा..