मोकळे आभाळ
मोकळे आभाळ
गेले सरूनी ते आठवणीतले क्षण
रम्य खोडसाळ बालपणीचे क्षण
धुंद जगलो, मुक्त विहरलो, स्वैर भटकलो
ना बंधन कोणाचे
उनाड वारा, पावसांच्या धार, कोवळे पिवळे ऊन
झेलले अंगावरती हरखून
आईच्या मायेची ऊब, मऊ पदराची कूस
घेतली कांबरून, पांघरून
कापडातली शिदोरी काला भाकरीचा
सवंगड्यां संग खाल्ला, चाखून - माखून
दिवस सरले स्वैर विहरले
आपल्याला मार्गी
कोंदट वारा कामाचा पसारा
संसारात गुरफटले
जीवन झाले व्यस्त
नाही एका क्षणाची उसंत
मनात आठवणी दाटून येती
हलकेच नयन पाणावती
शांत बसूनी घटकाभर मग
डोळे मिटुनी उजळती त्या नयनरम्य आठवणी
हास्याची एक लकेर उमटे
उदास चेहऱ्यावरती
असेच जगू मग ते आठवणीतले क्षण
करी मनाची सांगाती
नजर चोरून पाही वरती
उरले फक्त मोकळे आभाळ
अन् त्या रित्या आठवणी
