पुरे तुझे बहाणे सखया !
पुरे तुझे बहाणे सखया !


पुरे तुझे बहाणे सखया ...
पुरे तुझे बहाणे ...
प्रेमात तुझिया धुंद मोहवणे मजला ..
बाहुपाशात अलगद सामावून घेणे ..
उगाच हळुच तुझे छेडीत जाणे मजला ..
रुसव्यावर माझ्या मनसोक्त आनंद लुटणे ..
रागात पाहता मजला मग तू ..
बोलावून जवळी रुसवा दूर करणे ...
हातात हात घेऊनी माझा ..
सोबत सुखी आयुष्याची स्वप्न रंगविणे ...
मैत्रबंध जपता जपता ...
सारी सप्तपदी निभावून नेणे ...
अथांग सागर मजविषयी प्रेम मनात तुझिया ..
"नाही कोणी मी तुझा "म्हणत उगा तुझे मज सतावणे ...
पुरे तुझे बहाणे सखया ..