STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy

3  

Deepali Mathane

Tragedy

स्त्री

स्त्री

1 min
205

स्त्री एक न उलगडलेलं कोडं

क्षितिजाच्याही पार विश्व व्यापले

अनेक संकटातून निघे सुलाखून

कितीही जीवन उन्हात तापले

    सासर-माहेर दोन्ही तिचेच पण

    तरीही त्यागासाठी गृहीतच धरले

    तिला काय करायचं आहे शिकून

    या वाक्यातच तिचे जीवन हरले

निघते एखादी सखी खूप गुणी

जिद्दीने सगळ्या आवडी-घर सांभाळले

तर म्हणे या वयात काय करायचयं

आता कोणते मोठे दिवे लावले?

    अहो!कधीतरी तिलाही घ्याना समजून

    जाणून घ्याना कधी तिच्याही मनातले

    खूप काही नको असतं हो तिला 

    प्रेमळ शब्द हवेत तुमच्या शाबासकीतले

तिच जगं तिच विश्व फक्त घरच्यांभोवती

खूप मायेनं प्रेमानं जपते घरकुल आपले

तिच्या कर्तृत्वाचा गौरव तुमच्या कर्तव्यातून

पाझरेल असे स्थान द्या तिला घरातले

     जाणीव असावी थोडीतरी मनं आहे तिलाही

     ती ही एक वेली तुमच्या आधाराने उंचावेल

     मायेची साथ, प्रेमाचा हात बघा एकदा देऊन

     तुमचे सारे विश्व ती तुमच्या संसारात साकारेल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy