STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy

3  

Deepali Mathane

Tragedy

माणुसकी

माणुसकी

1 min
317

माणुसकीला माणुसकीचा

 आज गंध नसे राहिला

निर्दयतेच्या शुष्क प्रतिमेला

चंदनाचा हार वाहिला

    जाणिवांच्या चिते वरती

    निर्मम जाळ राहिला

    सुखदुःखाच्या पार्श्वभूमीने

   मोबाईल मध्ये अंत पाहिला

लेकरास घेऊनी मांडीवर

मेट्रोत बसली माय पहा

थकली भागली धावपळीने

चिमुरड्यास म्हणे उगा रहा

     शिंपडा कुणी जाणिवांचे अत्तर

    दरवळू द्या माणुसकीचा वारा

    मोबाइल म्हणजे सर्वस्व नव्हे

   द्या माणुसकीचा हात खरा

सहृदयी असावे मनं सर्वदा

पर दुःखाची जाणीव असावी

 मनी उमलावी ज्योत जागती

कर्तव्यातून माणुसकी पाझरावी

     बसल्या माय-बहिणी शेजारी

    पण दिसल्या बहू स्वकेंद्रित

    एक बहीण लेकरासंगे

    दिसेना त्यांना मोबाईलच्या तंद्रीत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy