साज पहाटेचा
साज पहाटेचा
1 min
179
पहाटेचा साज मनोहर
केशर सड्यात सजला
धुंद कुंद कळ्यांना घेऊनी
मोहक आसमंतात भिजला
सुवर्णमयी किरणे सोनेरी
पसरवूनी रवी मोहरला
सावट निशेचे दूर सारूनी
पहाटे सूर्योदयाने बहरला
नव प्रभात घेऊनी आली
पंख नव्या आकांक्षांचे
पहाटेच्या सोहळ्यात
गूज खुलले चैतन्याचे
मन मोकळ्या प्रवाहातील
स्वछंदी मनाचे पक्षी गाती
किलबिल ऐकू येई काननी
जोपासूनी मना-मनाची नाती
देवाच्या या गाभाऱ्यात
सोनसकाळी गात भुपाळी
करूनी प्रसन्नतेचा आहेर
सजली देवादिकांची मांदियाळी
