STORYMIRROR

Deepali Mathane

Others

3  

Deepali Mathane

Others

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

1 min
127

शिक्षणाचे महत्त्व समजून

बोध केला जनसामान्यास 

गरीबीतही केला अंगिकार

न सोडता शिक्षणाचा ध्यास

    वाचनाचे मोल उमगून

    उपोषित राहीले वाचनालयात

   सुकी पाव खाल्ली म्हणे

   ऐकता अश्रू दाटे नयनात

संविधानाचे जनक बनूनी

प्रज्ञावान जाहले विश्वविख्यात

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची

उत्कृष्ट वक्त्याची छबी प्रख्यात

      अस्पृश्यतेची उधळून कांती

      दीन-दलितांचे बनले आधार

      महाडच्या चवदार तळ्याचे पाणी

     सर्वांसाठी खुले केले साभार

माणसास माणूस म्हणवूनी

शिकवली जगास माणुसकी

मानवतेचा धर्म हा खरा

जागवली समाज बांधिलकी

     क्रांतिसूर्य, तेजस्वी, भारतरत्न

     अनेक उपाधी गेले मागे टाकून

    क्षूद्रांच्या जीवनी पसरूनी सोनेरी किरणे

    नमस्कार माझा या महामानवास वाकून


Rate this content
Log in