पहाटेचा साज
पहाटेचा साज
पहाटेचा साज मनोहर
केशर सड्यात सजला
धुंद कुंद कळ्यांना घेऊनी
मोहक आसमंतात भिजला
सुवर्णमयी किरणे सोनेरी
पसरवूनी रवी मोहरला
सावट निशेचे दूर सारूनी
पहाटे सूर्योदयाने बहरला
नव प्रभात घेऊनी आली
पंख नव्या आकांक्षांचे
पहाटेच्या सोहळ्यात
गूज खुलले चैतन्याचे
मन मोकळ्या प्रवाहातील
स्वछंदी मनाचे पक्षी गाती
किलबिल ऐकू येई काननी
जोपासूनी मना-मनाची नाती
देवाच्या या गाभाऱ्यात
सोनसकाळी गात भूपाळी
करूनी प्रसन्नतेचा आहेर
सजली देवादिकांची मांदियाळी...
