STORYMIRROR

Deepali Mathane

Romance

3  

Deepali Mathane

Romance

तो आणि संध्याकाळ

तो आणि संध्याकाळ

1 min
304

तो 

आणि 

संध्याकाळ

वाहता गार-गार वारा

छेडीत दोन मनांच्या तारा अविरत

सांज गारवा शोधित सूर मिलनाचे

तुझ्या मिठीत विसावत अलगद

शब्दसूर दरवळत कानी

पाहत मावळतीचा सूर्य निरागस

मनामनाचे गीत गात कोकीळ

छेडित मधूर सुंदर तान

दिवसभराचा थकवा सरला 

उत्साहाचा ऋतु बहरला जीवनी

सांज वेळ ही घेऊनी आली

तुझ्यातील चैतन्याची चाहूल

मन हलके-हलके मोहरले

सुख-स्वप्नांच्या वेली फुलवण्या...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance