STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy Inspirational

3  

Deepali Mathane

Tragedy Inspirational

कहर

कहर

1 min
345

तुडवूनी चिखल पायाखाली

बहरला होता माझा मळा

पावसाचा कहर तो पाहुनी

मुरल्या भिजल्या डोळ्यात कळा

     जगाच्या पोशिंद्याने सदा

     लावला आपल्या शेतास लळा

     दिल्या विधात्याने लाख वेदना

     तरीही दुःखाला म्हणे सोडून पळा

खंबीर उभा तो उध्वस्त मळ्यात

मेहनतीच्या जखमा वाहती भळ-भळा

मोत्याचे दान येण्या आधी हाती

दैवदुर्विलास पाहे निसर्गाचा ये वेळा?

      जाणीव अंतरी जरी मेहनतीचे 

      नसे मिळणार निश्र्चित फळ

      तरीही मेहनतीत कसूर नसे

      सोशित पोशिंदा प्रत्येक कळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy