प्रतिबिंब तुझे
प्रतिबिंब तुझे
आसवांचा घेऊन आधार
अश्रूही ओघळले होते
पापणीतले स्वप्न माझे
पापणीतच विरघळले होते
थकलेले जीव सारे
सावलीला निजले होते
माझे मन मात्र तुझ्याच
आठवणीत निजले होते
भावनांची गुंतागुंत पाहण्या
डोळेही उगाच मिटले होते
शब्दांचे आधार ठरले फोल
ना डोळ्यांचे पारणे फिटले होते
तु येशील या आशेवरती
वाटेचे ही डोळे लागले होते
मी हरवूनी माझ्या मध्येच सख्या
स्वत:शीच परके वागले होते
सैरभैर वाऱ्यासम आज
व्याकूळ मन जाहले होते
मग मारूनी स्वत:लाच मिठी
तुझेच प्रतिबिंब पाहले होते.......