STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy

4  

Deepali Mathane

Tragedy

खरी निरागस दिवाळी

खरी निरागस दिवाळी

1 min
375

नुसत्या हसऱ्या दिवाळीचे भाव

चेहऱ्यावर ओसंडून वाहत होते

कुणी गर्भश्रीमंतीत आकंठतेने 

मनमर्जीने चिंबचिंब नाहत होते

    बोलक्या गरिबीचे हास्य निरागस

    कुठे तरी हसरे फुलत होते

    कुठे श्रीमंतीचे दिवाळी वारे

    निरागस लेकरे झेलत होते

घेऊनी फुलझड्या हाती गोजिरे

गरिबीच्या प्रकाशात चमकत होते

निरागस बालपणातील दिवाळी

भाबडे अजुनच उजळवत होते

      पाहुनी बाजारी कपड्यात बाहुल्या

     नागडे लेकरू कळवळत होते

    ईश्वराचा पाहूनी हा भेदभाव

    माझे मन मात्र तळमळत होते

गरिबीचे दाहक चटके सोशीत

फटाक्यांचे मोती उडवीत होते

सारे दुःख सारून बाजूला

जीवनाचे गणित सोडवीत होते

    निरागस ते सोशिक बालपण

   गरिबीच्या उंबरठ्यावर रांगत होते

   गरीब श्रीमंतीची तमा न उरी

   दीपोत्सवाची कहाणी सांगत होते..    


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy