देव भेटण्या निघाले मी
देव भेटण्या निघाले मी
देव भेटण्या निघाले मी
दिसे निसर्गसुंदर सौदर्यात
अदभूत विश्वनिर्मितीत
भेटे मज प्रत्यक्षात
देव भेटण्या निघाले मी
दिसे आकाशात
अदभूत पावसाच्या थेंबात
भेटे मज प्रत्यक्षात
देव भेटण्या निघाले मी
दिसे सरितात
अदभूत जलामृतात
भेटे मज प्रत्यक्षात
देव भेटण्या निघाले मी
दिसे वृक्षात
अदभूत प्राणवायूवात
भेटेे मज प्रत्यक्षात
देव भेटण्या निघाले मी
दिसे फुलाफूलात
अदभूत
कलाकृतीत
भेटे मज प्रत्यक्षात
देव भेटण्या निघाले मी
दिसे फळात
अदभूत निर्मितीत
भेटे मज प्रत्यक्षात
देव भेटण्या निघाले मी
दिसे पाखरात
अदभूत मंजूळ गायनात
भेटे मज प्रत्यक्षात
देव भेटण्या निघाले मी
दिसे फुलपाखरात
अदभूत चित्राकृतीत
भेटे मज प्रत्यक्षात
देव भेटण्या निघाले मी
दिसे विधात्यांच्या विश्वनिर्मितीत
अदभूत जादूगीरीत
भेटे मज निसर्गाच्या कणाकणात प्रत्यक्षात