STORYMIRROR

Shilpa Dange

Abstract Fantasy Inspirational

4  

Shilpa Dange

Abstract Fantasy Inspirational

पर्याय

पर्याय

1 min
474

दुःखाला इथे कुठे औषध आहे का?

अश्रूंना डोळ्यांंशिवाय पर्याय आहे का?

आभाळ दाटते म्हणून पाऊस पडतो इथे

वादळांना वार्‍याशिवाय पर्याय आहे का?

सूर्य उगवतो म्हणून ऊन पडते इथे

पण सावलीला ऊन्हाशिवाय काही पर्याय आहे का?

रागामध्ये मौन जरी बोलते

तरी जाणिवांना शब्दांशिवाय पर्याय आहे का?

दिवसाही ही होतात जूलूम इथे जर

रात्रीला काही पर्याय आहे का

रोज कर्तव्यांना फुटते पालवी इथे

अपेक्षांना काही पर्याय आहे का?

जगणे जरी वाटले निरर्थक तरी

जीवनाला काही पर्याय आहे का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract