अशाच एका चांदण्या रात्री
अशाच एका चांदण्या रात्री
1 min
361
कधी चांदण्या रात्री
समुद्रकिनारी बसावं
अन् तार्यांकडे पाहून
स्वत:तच हरवून जावं
कधी निळ्या आकाशात
लुकलुकणारे असंख्य तारे मोजत
आठवणींमध्ये तुडूंब बुडावं
अन् लाटेवर लहरणार्या
चांदण्या बघत निखळ हसावं
कधी भरतीला आतुर झालेला चंद्र पाहून
स्वप्नांच्या ढगाआड लपावं
तर कधी आठवणी जपत
रात्रभर जागावं
अशाच सोनेरी क्षणांना अन्
लाटांच्या लयबद्ध गाजांना एकांतात अनुभवावं
जोवर आहेत चंद्र तारे
तोवर मनामनामध्ये प्रेम साठवावं
